दहीहंडीत ‘बिनजोड किंग’ मथुरचे आकर्षण!
भारत केसरी, महाराष्ट्र केसरीचा मानकरी ‘बिनजोड किंग’ मथुर ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः कळंबोली येथे प्रभुदास भोईर यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला यंदा मोठा उत्साह पाहायला मिळाला. गोविंदा पथकांची सलामी, ढोल-ताशांचा गजर आणि लावणीच्या कार्यक्रमाने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण केले, मात्र या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते भारत केसरी व महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेल्या ‘मथुर’ या खिल्लार-म्हैसूर क्रॉस जातीच्या बैलाने.
अडवली-कल्याण येथील राहुल पाटील यांच्या मालकीचा मथुर हा शर्यतीच्या मैदानातील दमदार कामगिरीसाठी परिचित आहे. त्याच्या वेगामुळे आणि शर्यतीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ‘बिनजोड किंग’ अशी ओळख मिळाली आहे. भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांसारख्या मानाच्या शर्यतींसह अनेक स्पर्धांमध्ये मथुरने आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे कळंबोलीतील दहीहंडीच्या व्यासपीठावर मथुरची झालेली उपस्थिती ही विशेष आकर्षण ठरली. राहुल पाटील यांच्यासह मथुरचे दहीहंडी सोहळ्यात आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मथुरच्या ताकदीची आणि शर्यतीतील कामगिरीची माहिती असलेल्या नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी मथुरसोबत छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला. ग्रामीण महाराष्ट्रातील पारंपरिक बैलगाडी शर्यतींच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या बैलाची दहीहंडीच्या मंचावरील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या कार्यक्रमाला पनवेलचे महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व सिनेकलाकार कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढविली.
ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये अन्नदान
या दहीहंडी उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये अन्नदान करण्यात आले. दहीहंडी या पारंपरिक उत्सव असला तरी या निमित्ताने अन्नदान करून आयोजकांनी धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. माणुसकीला केंद्रस्थानी ठेवण्याचा हा उपक्रम असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.