वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : अंबाडी अपर तालुकानिर्मितीची मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा कृती समितीचे सल्लागार शांताराम पाटील यांनी दिला आहे. अध्यक्ष शरद आंबो पाटील, सचिव सुदाम पाटील व सल्लागार मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबाडी तालुकानिर्मिती ही केवळ प्रशासकीय मागणी नसून नागरिकांना सुलभ प्रशासन, विकासाच्या सुविधा आणि योग्य प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठीची जनहिताची मागणी असल्याचे समितीने स्पष्ट केले. या मागणीसाठी २३ जूनला धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर १ सप्टेंबरला खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी अंबाडी परिसराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि पर्यटनविषयक महत्त्व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, पडघा अपर तालुकानिर्मितीच्या प्रस्तावाविरोधात १४ हजार ६६३ हरकती दाखल झाल्याचे समितीने सांगितले. अंबाडी अपर तालुका निर्मितीबाबत सकारात्मक अहवाल महसूल विभागामार्फत सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचेही समितीने स्पष्ट केले. आता आश्वासनांपेक्षा सरकारच्या निर्णयाची आवश्यकता आहे. अंबाडी तालुका ही जनतेची दीर्घकाळ प्रलंबित मागणी आहे, अशी भूमिका अध्यक्ष शरद आंबो पाटील यांनी व्यक्त केली. मागणीवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करून शांताराम पाटील उपोषणास बसतील, असा इशारा समितीने दिला.
४५ ग्रामपंचायतींचे ठराव सादर
तालुकानिर्मितीसाठी ४५ ग्रामपंचायतींचे ग्रामसभा ठराव, त्यापैकी ३७ पेसा ग्रामपंचायतींचे ठराव, १० आमदार व दोन खासदारांची शिफारसपत्रे; तसेच वनमंत्री गणेश नाईक यांचे शिफारसपत्र सरकारकडे सादर केल्याचे समितीने सांगितले. १९९४ मधील तत्कालीन कोकण आयुक्त जी. बी. पिंगुळकर यांच्या अहवालातही अंबाडी तालुक्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.