मोदकांसाठी सुगंधित तांदळाला मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बासमती, इंद्रायणीसह आंबेमोहोरच्या खरेदीला जोर
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उकडीच्या मोदकांसाठी लागणाऱ्या सुगंधित तांदळाला बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. विशेषतः बासमती, इंद्रायणी आणि आंबेमोहोर या तांदळाच्या प्रकारांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असून, मागणी वाढल्याने त्यांच्या भावातही वाढ झाली आहे.
मोदकासाठी तांदळाचे पीठ मऊ, बारीक आणि चवदार असणे आवश्यक असल्याने अनेक गृहिणी नेहमीच्या तांदळाऐवजी सुगंधित तांदळाला पसंती देतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच किराणा दुकाने आणि बाजारपेठांमध्ये या तांदळाची मागणी वाढली आहे.
सध्या बाजारात इंद्रायणी तांदूळ साधारण ६५ ते ९० रुपये किलो, तर आंबेमोहोर १०० ते १३५ रुपये किलो किरकोळ भावाने उपलब्ध आहे. बासमती तांदळाचा भाव प्रकार आणि गुणवत्तेनुसार बदलत असून, तो साधारण ८० ते १५० रुपये किलो किंवा त्यापुढे आहे.
गृहिणींच्या बजेटवर परिणाम
गणेशोत्सवात घराघरांत मोदक तयार केले जात असल्याने तांदळासह गूळ, खोबरे, खसखस, वेलची यांसारख्या साहित्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात किराणा खर्च वाढल्याचे गृहिणी सांगत आहेत. दरम्यान, सुगंधित तांदळाला वाढलेली मागणी, आवक आणि बाजारातील उपलब्धता याचा भावावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आगामी दिवसांत मोदकांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने तांदळाच्या बाजारभावावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.