मुंबई

पेण रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

CD

पेण रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट
६३ कोटींचा निधी उपलब्ध; आधुनिक सुविधांनी स्थानक सजणार
पेण, ता. ६ (वार्ताहर) : पेण रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून, त्यासाठी ६३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोहा आणि पेण रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणासाठी केंद्र स्तरावरून निधी मंजूर करण्यात आला आहे. पेण स्थानकासाठी उपलब्ध झालेल्या या निधीतून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पेण रेल्वे स्थानकाची दुरवस्था दूर करावी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा तसेच पेण-पनवेल लोकल सेवा सुरू करावी, यासाठी पेणकर आणि प्रवासी संघटनांकडून अनेकदा मोर्चे व आंदोलने करण्यात आली होती. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार तटकरे यांनी पाठपुरावा केला. स्थानकाच्या नूतनीकरणाच्या आराखड्याचे चित्रफितीद्वारे सादरीकरण बुधवारी (ता. ४) पेण नगरपालिका सभागृहात करण्यात आले.
नव्या आराखड्यानुसार रस्त्यापासून स्थानकापर्यंत आकर्षक प्रवेशद्वार, गणेशमूर्तीची उभारणी, स्वतंत्र रिक्षा, दुचाकी-तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, स्थानक परिसराचे सुशोभीकरण, प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण, अद्ययावत तिकीटघर, स्वागतकक्ष आणि उद्यान आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. बैठकीस नगराध्यक्षा प्रीतम पाटील, निवृत्ती पाटील, कलावती पाटील, आनंद जाधव, अफ्रीन अखवारे, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, ॲड. मंगेश नेने, विजय कदम, मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT