मुंबई

वसई विरार नालासोपारा मध्ये दहीहंडी उत्सवात १६ गोविंदा जखमी; १५ किरकोळ तर एक गंभीर जखमी

CD

वसई, विरार, नालासोपाऱ्यातील
दहीहंडीत १६ गोविंदा जखमी

नालासोपारा, ता. ६ ( बातमीदार) : वसई, विरार, नालसोपाऱ्यात, शनिवारी (ता. ५) दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात मानवी मनोरे रचताना खाली पडून १६ गोविंदा वेगवेगळ्या ठिकाणी पडून जखमी झाले. त्यातील १५ गोविंदांना किरकोळ जखमा झाल्या, तर एका १३ वर्षांच्या गोविंदावर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.
अनुज रजाक असे १३ वर्षांच्या उपचार सुरू असणाऱ्या जखमी गोविंदाचे नाव असून, वसई येथे वास्तव्यास आहे. वसई, विरार, नालसोपाऱ्यात ८२५ खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ११८ गोविंदा पथकांनी आठ हजार गोविंदांची अधिकृत वसई-विरार महापालिकेकडे नोंदणी केली होती. दिवसभरात अतिशय उत्सहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात एकूण १६ गोविंदा जखमी झाले.
वसई-विरार महापालिकेच्या चंदनसार येथील रुग्णालयात सात, तुळिंज रुग्णालयात चार, सोपारा रुग्णालयात दोन, सरडीएम पेटीट रुग्णालयात तीन अशा १६ जनांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. तर एक १३ वर्षांच्या अनुज रजाक या गोविंदाच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर पालिकेच्या सर डीएमपेटीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT