मुंबई

प्रवासी जेट्टी दुरुस्तीचे भूमिपूजन

CD

प्रवासी जेट्टी दुरुस्तीचे भूमिपूजन
मुरूड खोरा बंदरातील जुन्या जेट्टीला मिळणार नवे रूप

मुरूड, ता. ६ (बातमीदार) : आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या निधीतून मुरूड खोरा बंदर येथील जुन्या प्रवासी जेट्टीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन नुकतेच रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या दुरुस्तीमुळे जेट्टीची सुरक्षितता आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी, शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मिनमिने, उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, महिला जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील, युवा उपजिल्हाप्रमुख दीपेश वरणकर, मुरूड पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी जंगम, सदस्य गणेश नाक्ती, तालुका संघटक यशवंत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

प्रवासी सुविधांना चालना
भूमिपूजनप्रसंगी विघ्नेश माळी यांनी सांगितले, की खोरा बंदर परिसरातील जुन्या प्रवासी जेट्टीच्या दुरुस्तीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना अधिक चांगल्या व सुरक्षित सुविधा मिळतील. मुरूड परिसरात पर्यटनाला मोठा वाव असल्याने जेट्टीची सुधारणा झाल्यानंतर प्रवासी वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होईल. यामुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या संधी वाढण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT