पोलादपूरच्या पाणीप्रश्नाला मिळणार गती
नमो उद्यानासाठी एक कोटी, पाणीपुरवठ्यासाठी ३० कोटींच्या निधीची कामे
पोलादपूर, ता. ६ (वार्ताहर) : पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पोलादपूर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या पाणीप्रश्नासाठी ११ कोटी रुपये आणि वाढीव निधी म्हणून १९ कोटी रुपये, असा एकूण ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पोलादपूर शहराचा पाणीप्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पोलादपूर नगर पंचायत हद्दीत नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे ५० लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या शहरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामांमुळे शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांना बळ मिळणार आहे.
कार्यक्रमास अर्थ व नियोजन सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा अस्मिता पवार, उपनगराध्यक्ष मनोज प्रजापती, सभापती अविनाश शिंदे, राजिप सदस्य नीलेश कुंभार, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, संपर्कप्रमुख किशोर भाऊ जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिलीप भागवत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.