मुंबई

‘एक पेड माँ के नाम’ला तटरक्षक दलाची साथ

CD

‘एक पेड माँ के नाम’ला तटरक्षक दलाची साथ
ओंकार विद्या मंदिराला १०० रोपे; विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाचे संस्कार
मुरूड, ता. ६ (बातमीदार) : ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक अभियानांतर्गत मुरूड येथील हिंदू एज्युकेशन सोसायटी संचालित ओंकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या पदाधिकाऱ्यांसोबत वृक्षारोपण केले. या उपक्रमासाठी भारतीय तटरक्षक दलाने शाळेला १०० रोपे उपलब्ध करून दिली. याबद्दल मुख्याध्यापिका प्रविता गार्डी यांनी तटरक्षक दलाचे आभार मानले.
आई आपल्या मुलाचे संगोपन करून त्याला सावली व सुरक्षितता देते, त्याचप्रमाणे वृक्ष मानवाला प्राणवायू, सावली आणि पर्यावरणीय संतुलन देतात. त्यामुळे आईच्या सन्मानार्थ एक झाड लावण्याची संकल्पना भावनिक तसेच पर्यावरणपूरक असल्याचे प्रविता गार्डी यांनी सांगितले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ वृक्षारोपणाची नव्हे, तर लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लावलेले प्रत्येक रोप नियमित पाणी देऊन आणि त्याचे संरक्षण करून जगविणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मुरूडसारख्या निसर्गसमृद्ध परिसरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाला विशेष महत्त्व आहे. शाळेतील ही १०० रोपे भविष्यात मोठी झाडे बनून विद्यार्थ्यांसह परिसराला सावली देतील आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लावतील. देशाच्या सागरी सुरक्षेसोबतच पर्यावरण संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तटरक्षक दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT