मुंबई

प्रेमकुंज सोसायटीमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम; आर्किटेक्टसह पालिकेच्या तत्कालीन नगररचनाकारावर गुन्हा दाखल!

CD

आर्किटेक्टसह पालिकेच्या
नगररचनाकारावर गुन्हा
संगनमताने बांधकाम; अधिकाऱ्यांच्या कारभारावर संशय

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) ः बदलापूर पश्चिम, सोनवली येथील प्रेमकुंज को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या इमारतीच्या बांधकाम परवानगी आणि सुधारित आराखड्याच्या प्रकरणातून आर्किटेक्ट प्रमोद विष्णू पाटील आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे तत्कालीन नगररचनाकार विवेक गौतम यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटीचे अध्यक्ष विनोद बबन मिरकुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंजूर बांधकाम आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा सादर करण्यात आला आणि त्यानंतर इमारतीमध्ये अतिरिक्त-अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. आठव्या मजल्यावरील दोन सदनिका व रिफ्युज एरिया, नवव्या मजल्यावरील दोन सदनिका तसेच तळमजल्यावरील पाच खोल्या अनधिकृत असल्याचा दावा तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे सोसायटीधारकांना भोगवटा दाखला मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याचेही नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
तक्रारीनुसार, आर्किटेक्ट प्रमोद यांच्याकडील परवानगीच्या अधिकारापेक्षा अधिक क्षमतेचा आराखडा सादर करण्यात आला. तसेच तत्कालीन नगररचनाकार विवेक यांनी प्रत्यक्ष स्थळपरीक्षण न करता बांधकामास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला. सुधारित आराखड्याच्या आधारे अनधिकृत बांधकामाला वैधतेचे स्वरूप देऊन सदनिकांची विक्री करण्यात आली आणि त्यामुळे सोसायटीधारकांची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. संबंधित इमारतीच्या बांधकामात यापूर्वीही परवानगी आणि प्रत्यक्ष बांधकामातील तफावतीबाबत पालिकेकडे तक्रारी झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
-----------------------------
अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह
एप्रिल २०२६ मध्ये नगर परिषदेचे लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्याविरुद्ध कंत्राटदाराकडून सहा टक्के लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. संबंधित प्रकरणात २२ लाख ४३ हजार रुपयांच्या देयकांच्या मोबदल्यात एक लाख ३४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. एकीकडे लेखाधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा गुन्हा आणि त्यानंतर आता तत्कालीन नगररचनाकारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे; मात्र दोन्ही प्रकरणांतील आरोपांची अंतिम सत्यता संबंधित तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT