मुंबई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा सज्ज

CD

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा सज्ज
गर्दीच्या ठिकाणांसह महामार्गावर बंदोबस्त
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात हजारो चाकरमानी दाखल होत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, एसटी स्थानके तसेच महामार्गांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात यंदा २९१ सार्वजनिक, तर एक लाख पाच हजार ५४ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्सवकाळातील वाढती गर्दी लक्षात घेता जिल्ह्यात सात पोलिस उपअधीक्षक, २९ पोलिस निरीक्षक, १२८ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि १,९०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ५०० होमगार्ड, एसपीआरएफची एक कंपनी, ३० अधिकारी आणि ३०० पोलिस अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा उपलब्ध राहणार आहे. एटीबी व एटीसी पथकांसह सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी सायबर सेलचे एक अधिकारी आणि पाच अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत.
नागरिकांनी गणेशोत्सव आनंदात व सुरक्षित वातावरणात साजरा करावा. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.

विशेष गस्ती पथक :
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावर प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर मोटारसायकलींच्या सहाय्याने विशेष गस्त घालण्यात येणार आहे. या पथकात ३० अधिकारी आणि ३० अंमलदारांचा समावेश आहे.

गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त :
बाजारपेठा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा परिसर, एसटी स्थानके आणि महामार्गांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Elections: पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपची पंजाबमध्ये रणनीती! 'आप'ला हद्दपार करण्यासाठी 'हा' मुद्दा केंद्रस्थानी

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

Pomegranate Price : आळेफाटा येथील मार्केटमध्ये सोमवारी डाळिंबास २० किलोच्या एका क्रेटला मिळाला ६ हजार रुपये बाजारभाव

Horoscope: ‘या’ ४ राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकतच नाही! नको तिथे खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल, आर्थिक सवय ठरते डोकेदुखी

Marathi News Live Updates: गणवेश जबाबदारीची जाणीव करुन देतो- पोलिस महासंचालक सदानंद दाते

SCROLL FOR NEXT