मुंबई

पनवेल महापालिकेत ‘लोकशाही दिन’

CD

पनवेल महापालिकेत लोकशाही दिन
नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : सर्वसामान्यांच्या प्रलंबित तक्रारी आणि समस्यांचे तत्परतेने निवारण करण्यासाठी पनवेल पालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षात सोमवारी (ता. ७) लोकशाही दिनाचे आयोजन केले होते. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांकडून प्राप्त अर्जांची गांभीर्याने दखल घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, सहाय्यक आयुक्त बाळाराम रातांबे, शहर अभियंता राजेश कर्डिले, सामान्य प्रशासन विभागप्रमुख कीर्ती महाजन यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित एकूण दोन अर्ज प्राप्त झाले. संबंधित अर्जांची दखल घेत नागरिकांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
पनवेल महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी अथवा अर्ज लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी समन्वय अधिकाऱ्यांकडे सादर करावेत. तसेच संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Elections: पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपची पंजाबमध्ये रणनीती! 'आप'ला हद्दपार करण्यासाठी 'हा' मुद्दा केंद्रस्थानी

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

Pomegranate Price : आळेफाटा येथील मार्केटमध्ये सोमवारी डाळिंबास २० किलोच्या एका क्रेटला मिळाला ६ हजार रुपये बाजारभाव

Horoscope: ‘या’ ४ राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकतच नाही! नको तिथे खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल, आर्थिक सवय ठरते डोकेदुखी

Marathi News Live Updates: गणवेश जबाबदारीची जाणीव करुन देतो- पोलिस महासंचालक सदानंद दाते

SCROLL FOR NEXT