मुंबई

शिल्पकारांच्या कलाप्रवासाला मिळणार शब्दरूप

CD

शिल्पकारांच्या कलाप्रवासाला मिळणार शब्दरूप
प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर असोसिएशनतर्फे लेखन स्पर्धा; २५ सप्टेंबरपर्यंत हस्तलिखित पाठविण्याचे आवाहन
मुंबई, ता. ७ : प्रोग्रेसिव्ह स्कल्प्टर असोसिएशन, मुंबई या महाराष्ट्रव्यापी शिल्पकारांच्या संघटनेच्या वतीने शिल्पकारांच्या जीवनातील संघर्ष, यश-अपयश आणि कलाप्रवास जगासमोर आणण्यासाठी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एस. के. बाकरे मेमोरियल सोसायटी, नागपूर यांच्या प्रायोजकत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, चित्रकार व लेखक विजयराज बोधनकर यांच्या समन्वयाने ती घेण्यात येत आहे.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसह तीन उत्तेजनार्थ विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. हस्तलिखिताची परंपरा जपण्यासाठी स्पर्धकांनी लेख फुलस्केप कागदावर मार्जिन सोडून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणे आवश्यक आहे. टाइप केलेले लेख स्वीकारले जाणार नाहीत. प्रत्येक पानावर क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे.
लेखावर स्पर्धकाचे नाव, गाव, दूरध्वनी क्रमांक किंवा पत्ता लिहायचा नसून, ही माहिती पोस्टाच्या पाकिटावर नमूद करायची आहे. लेख कुरियर किंवा स्पीड पोस्टाने आयोजकांकडे ब्रह्मांड को. ऑप. सोसा. २०३/ फेज नंबर १/ बिल्डिंग नं १, आझादनगर, घोडबंदर रोड, ठाणे पश्‍चिम, ४००६०७ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
शिल्पकारांची कला आणि त्यांची बौद्धिक संपदा यांचा परिचय समाजाला व्हावा, तसेच त्यांच्या संघर्षमय कलाप्रवासाची नोंद व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कलावंत हा अनेकदा ‘बंद पुस्तकासारखा’ असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून शिल्पकारांच्या जीवनातील अनेक अनुभवांची दारे उघडतील, असा विश्वास एस. के. बाकरे मेमोरियलचे संस्थापक, चित्रकार, कलासंग्राहक व कला समीक्षक मिलिंद लिंबेकर यांनी व्यक्त केला.

२५ सप्टेंबपर्यंत पाठवा लेख
या स्पर्धेत शिल्पकारांनी आपल्या बालपणापासून तारुण्यापर्यंतचा प्रवास, कला शिक्षण तसेच प्रदीर्घ व्यावसायिक कारकिर्दीत आलेले अनुभव, संघर्ष, यश आणि अपयश यावर लेख लिहायचा आहे. लेखाची शब्दमर्यादा अडीच ते तीन हजार शब्दांची असून, लेख पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२६ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

Onion Price Hike: कांद्याने ओलांडली 'पन्नाशी'! घाऊक भाव ५३, किरकोळ ७० रुपयांवर

SCROLL FOR NEXT