डीएनएस बँकेला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र
कर्मचाऱ्यांचा विश्वास, सकारात्मक वातावरण, नेतृत्वाची दखल
मुंबई, ता. ७ ः डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेडला ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट, इंडिया यांच्याकडून प्रतिष्ठित ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
बँकेच्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष ॲड. गणेश वसंत धारगळकर यांनी या गौरवाची घोषणा केली. नुकत्याच गठित झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या कार्यकाळातील हा पहिला महत्त्वपूर्ण सन्मान असून, तो बँकेसाठी अत्यंत आनंददायी आणि सकारात्मक सुरुवात ठरला आहे.
कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अभिप्राय व प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित असलेले हे प्रमाणपत्र बँकेतील विश्वास, सकारात्मक कार्यसंस्कृती आणि कर्मचारीकेंद्री नेतृत्वाचे द्योतक आहे. ५६ वर्षांच्या वाटचालीत डीएनएस बँकेने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये विस्तार साधताना विश्वास, सहकार, सामूहिक प्रगती आणि सेवाभाव ही मूल्ये जपली आहेत.
याप्रसंगी अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर म्हणाले, “हा सन्मान डीएनएस बँक परिवारातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समर्पणाला आणि योगदानाला समर्पित आहे.
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित यांनी सांगितले की, हे प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांचा संस्थेवरील विश्वास अधोरेखित करणारे असून, आगामी काळात अधिक नावीन्यपूर्ण, उत्तरदायी आणि ग्राहककेंद्री कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
कर्मचारी विकास, कौशल्यवृद्धी, पारदर्शक संवाद, नेतृत्वविकास, कल्याण आणि सर्वसमावेशकता यांना प्राधान्य देत डीएनएस बँक आपली भविष्यवेधी मनुष्यबळ धोरणे अधिक सक्षम करत आहे. कर्मचारी अनुभव आणि ग्राहक अनुभव यांचा थेट संबंध असल्याने, आनंदी, सक्षम आणि प्रेरित कर्मचारीवर्गाच्या माध्यमातून उत्कृष्ट ग्राहकसेवा देण्यास बँक कटिबद्ध आहे. जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असलेला हा सन्मान प्राप्त करणाऱ्या भारतातील अग्रणी बहुराज्यीय शेड्युल्ड सहकारी बँकांमध्ये आता डीएनएस बँकेचा समावेश झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.