मुंबई

गणेशोत्सवासाठी वाद्य निर्मात्यांची लगबग

CD

गणेशोत्सवासाठी वाद्यनिर्मात्यांची लगबग
भजन-कीर्तनासाठी पारंपरिक वाद्यांना पसंती
पोयनाड, ता. ७ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. डीजेच्या वापरावरून राज्यभर चर्चा सुरू असतानाच यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी दिसून येत आहे. भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सांगीतिक कार्यक्रमांसाठी वापरली जाणारी तबला, पेटी, ढोलकी, ढोलक, पखवाज आदी वाद्ये अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसर तसेच खारेपाट विभागात आकर्षण ठरत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील महिनाभर वाद्यनिर्माते निर्मितीच्या कामात व्यस्त असून, सध्या ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. दीड, पाच आणि दहा दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवात भजनांसाठी या वाद्यांचा वापर केला जातो. वाद्यनिर्मितीसाठी लागणारे चामडे, शाई, ओड व लाकूड यांच्या दरात तसेच मजुरीत वाढ झाल्याने वाद्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. वाद्यांच्या दरात सुमारे एक हजार ते दीड हजार रुपयांची वाढ झाली असली तरी ग्राहक आणि भजनप्रेमींचा पारंपरिक वाद्यांकडे कल कायम असल्याचे चरी येथील वाद्यनिर्माते प्रतीक नाईक यांनी सांगितले.
डीजेच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही पारंपरिक भजनांना ग्रामीण भागात चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ढोलकी, टाळ, पखवाज, तबला आणि ढोलक यांसारख्या वाद्यांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पारंपरिक वाद्यनिर्मितीला एरवीच्या तुलनेत मोठी चालना मिळत असल्याचे चित्र आहे.

चौकट
या वाद्यांचा समावेश
पारंपरिक वाद्यांमध्ये पेटी, ढोलकी, तबला, पखवाज, मृदंग, टाळ, झांज, चिपळ्या, संबळ, दिमडी आणि ढोलक यांचा समावेश होतो.

पारंपरिक भजनाला पसंती
पोयनाड परिसरात गणेशोत्सवात पारंपरिक भजनांना विशेष पसंती दिली जाते. प्रासादिक, शास्त्रीय तसेच घरगुती व ग्रामस्थ मंडळांच्या भजनांमध्ये ढोलकी, टाळ, पखवाज, तबला आणि ढोलक या पारंपरिक वाद्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.


छायाचित्र :

पोयनाड : गणेशोत्सवासाठी पारंपरिक वाद्य ही सजवून तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Elections: पश्चिम बंगालच्या धर्तीवर भाजपची पंजाबमध्ये रणनीती! 'आप'ला हद्दपार करण्यासाठी 'हा' मुद्दा केंद्रस्थानी

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

Pomegranate Price : आळेफाटा येथील मार्केटमध्ये सोमवारी डाळिंबास २० किलोच्या एका क्रेटला मिळाला ६ हजार रुपये बाजारभाव

Horoscope: ‘या’ ४ राशींच्या लोकांच्या हातात पैसा टिकतच नाही! नको तिथे खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल, आर्थिक सवय ठरते डोकेदुखी

Marathi News Live Updates: गणवेश जबाबदारीची जाणीव करुन देतो- पोलिस महासंचालक सदानंद दाते

SCROLL FOR NEXT