मुंब्र्यात कोडीनयुक्त
औषधांचा साठा जप्त
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ३२९ बाटल्यांसह तरुणाला अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीनयुक्त औषधांच्या ३२९ बाटल्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुंब्र्यातून जप्त केल्या. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद हामीद बाजा मोइनुद्दीन शेख (२०) याला अटक केली असून, त्याच्याकडून औषधांच्या साठ्यासह मोबाईल जप्त केला असून, एकूण चार लाख चार हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई शनिवारी (ता. ५) रात्री रेतीबंदर परिसरात करण्यात आली.
मुंब्रा पोलिस ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाला औषधांच्या साठ्याची विक्री करण्यासाठी दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी रेतीबंदर रेल्वे पुलाजवळील सर्व्हिस रोडवर सापळा रचत रात्री साडेआठच्या सुमारास एका चारचाकी कारमधून उतरणाऱ्या संशयास्पद तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॉक्स मध्ये ‘ओनेरेक्स’ आणि ‘फेन्सिरेस्ट’ नावाच्या कोडीनयुक्त औषधी सिरपच्या बाटल्या आढळल्या.
पहिल्या बॉक्समध्ये ११५, दुसऱ्या बॉक्समध्ये १२० आणि तिसऱ्या बॉक्समध्ये ९४ अशा एकूण ३२९ बाटल्या आढळल्या. त्या बाटल्यांची किंमत तीन लाख ९४ हजार ८०० रुपये, तर मोबाईलची किंमत १० हजार रुपये असा एकूण चार लाख चार हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपीने हा औषधसाठा उत्तर प्रदेशातील सत्यम कुमार याच्याकडून विक्रीसाठी मागविल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात विविध कलमांनूसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.