मुंबई

आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई रखडली

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : घोडबंदर येथील ओवळा-पानखंडा रस्त्यावरील शिवमंदिराजवळील कथित बेकायदा बांधकामावर कारवाईचे लेखी आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने तक्रारदार अशोक सोनावले यांनी सोमवारी (ता. ७) ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले. महापालिका आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिल्यानंतरही स्थानिक अधिकारी पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत असल्याचा दावा सोनावले यांनी केला आहे.

ओवळा-पानखंडा रस्त्यावरील शिवमंदिरालगत उभारण्यात आलेल्या या बांधकामाविरोधात सोनावले गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेकडे तक्रारी व निवेदने देत पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आयुक्त सौरभ राव यांनी १० जून रोजी उपायुक्त (अतिक्रमण) जितेंद्र निकम यांना बांधकामाची शहानिशा करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महापालिका प्रशासनाने १७ ऑगस्ट रोजी या बांधकामावर निष्कासन कारवाई प्रस्तावित असल्याचे लेखी कळविले, मात्र कारवाईच्या दिवशी पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याचे कारण देत ती स्थगित करण्यात आली. आवश्यक पोलिस बंदोबस्ताची पूर्तता करून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते, मात्र सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटूनही कारवाईची कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सोनावले यांनी सांगितले. तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी आणि शिवमंदिराजवळील बेकायदा बांधकाम तातडीने जमीनदोस्त करावे, अशी मागणी सोनावले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

Onion Price Hike: कांद्याने ओलांडली 'पन्नाशी'! घाऊक भाव ५३, किरकोळ ७० रुपयांवर

SCROLL FOR NEXT