मुंबई

पनवेल-कळंबोली रस्त्यावर डंपर व रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

CD

पनवेल, ता. ७ (वार्ताहर) : पनवेल-कळंबोली मार्गावर रविवारी सायंकाळी रिक्षा आणि भरधाव मोटारसायकलच्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालकाने अचानक रिक्षा वळवल्यामुळे मोटारसायकल रिक्षाला धडकली आणि रस्त्यावर पडलेला तरुण मागून येणाऱ्या डम्परखाली चिरडला गेला. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी रिक्षाचालक आणि डम्परचालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव मुकुंद सुनील सोर्नी (२४) असे आहे, तर जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव संतोष मुन्नाप्रसाद मौर्या (२३) असे आहे. हे दोघेही मित्र तुर्भे स्टोअर येथील शिवशक्तीनगरमध्ये राहत होते. रविवारी दुपारी हे दोघे आपल्या यामाहा मोटारसायकलने (एमएच ०३ एमजे ६९८५) पनवेल येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते सायंकाळी तुर्भे येथे परतत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुकुंद आणि संतोष हे पनवेल-कळंबोली रस्त्यावरून भरधाव जात होते. या वेळी आसूडगावजवळ त्यांच्या पुढे असलेल्या रिक्षाचालकाने (एमएच ०२ एफ १७६२) पेट्रोलपंपावर जाण्यासाठी अचानक आपली रिक्षा उजव्या बाजूला वळवली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुकुंद सोर्नी याची यामाहा मोटारसायकल रिक्षावर जाऊन धडकली. त्यामुळे संतोष मौर्या व मुकुंद सोर्नी हे दोघेही डाव्या बाजूला रस्त्यावर पडले. याचवेळी पाठीमागून भरधाव येत असलेल्या डम्परने (एमएच ०४ एमआर १८००) मुकुंद सोर्नी यास फरपटत नेले. यात त्याचे डोके आणि शरीरास गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच याचा मित्र संतोष मौर्या हा किरकोळ जखमी झाला. खांदेश्वर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या रिक्षाचालकासह डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT