‘एनटीसी’च्या कामगारांचे साखळी उपोषण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : एनटीसी मिल कामगारांच्या ११ महिन्यांच्या थकीत पगारासह अन्य मागण्यांचा गुंता केंद्र सरकारने सोडवावा, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने सोमवारी (ता. ७) मुंबईतील चारही एनटीसी गिरण्यांच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. सरकारने कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मकता न दाखवल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रीय मिल मजूदर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिला.
गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत एनटीसी मिल कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली, मात्र सकारात्मक चर्चा होऊनही प्रशासनाकडून त्याची पूर्तता होत नसल्याने गिरणी कामगारांनी मुंबईतील बंद असलेल्या टाटा मिल, दादासाहेब फाळके रोड, इंदू मिल क्रमांक ५, काळाचौकी, पोदार मिल, एन एम जोशी मार्ग आणि दिग्विजय मिल, लालबाग गिरण्यांसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या वेळी संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सचिव शिवाजी काळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.