मुंबई

आतकोलीत बेकायदा दगडखाणींचा धडाका

CD

आतकोलीत बेकायदा
दगडखाणींचा धडाका
४८ तासांत खाणी बंद करण्याची मनोज प्रधान यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : भिवंडी तालुक्यातील आतकोली परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या दगडखाणींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दगड उत्खननासाठी मोठ्या प्रमाणावर येथे खोदकाम करण्यात येत असून, जिलेटीन कांड्यांसह अन्य स्फोटकांचा वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. यामुळे महामार्गासह पिसे धरणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्याकडे केली.

आतकोली पंचक्रोशीचा पाहणी दौरा मागील आठवड्यात मनोज प्रधान यांनी केला होता. या पाहणीत कथित अनधिकृत दगडखाणींमधून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भातील कागदपत्रे आणि निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आतकोली येथील सुमारे ३४ हेक्टर जमीन २०२४ मध्ये ठाणे महापालिकेच्या ताब्यात आली आहे. या भूखंडावर तसेच परिसरातील विविध सरकारी जमिनींवर आजही दगडखाणी सुरू असल्याचा आरोप प्रधान यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांत सुमारे ३० फूट खोलीपर्यंत उत्खनन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, उत्खननाचे प्रमाण आणि त्यातून होणाऱ्या कथित रॉयल्टीच्या नुकसानीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. आगामी ४८ तासांत या कथित बेकायदा दगडखाणी कायमस्वरूपी बंद करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत. प्रशासनाने कारवाई केली नाही, तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनोज प्रधान यांनी दिला.
.....................
जलस्रोतांवरही परिणाम?
दगडखाणींसाठी जमिनीचे खोलवर उत्खनन होत असल्याने परिसरातील भूजलसाठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा प्रधान यांनी केला. शहरीकरण आणि उन्हाळ्यात आटणारे पाण्याचे स्रोत या पार्श्वभूमीवर अनियंत्रित उत्खननाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आतकोली परिसरात नद्या आणि पिसे धरणासारखे महत्त्वाचे जलस्रोत आहेत. त्यामुळे खोल उत्खनन आणि स्फोटकांच्या वापरामुळे या जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT