मुंबई

स्मार्ट मीटरच्या बिलवाढीने रहिवाशांना धक्का ‘आधी जुन्या-नव्या मीटरची महिनाभर चाचणी घ्या’

CD

स्मार्ट मीटरच्या बिलवाढीने रहिवाशांना धक्का
जुन्या-नव्या मीटरची चाचणी घ्या; संजय केळकरांच्या महावितरणला सूचना

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : हिरानंदानी ऋतू इस्टेटमधील वीजबिल वाढीच्या तक्रारीने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सौरऊर्जा यंत्रणा असतानाही वीजबिलात सुमारे १० टक्के वाढ झाल्याची तक्रार रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जुना आणि नवीन मीटर महिनाभर समांतरपणे तपासून त्याची अचूकता पडताळावी आणि त्यानंतरच नवीन मीटर बसवावेत, अशा सूचना केळकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या १२७ व्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात हिरानंदानी ऋतू इस्टेटमधील रहिवाशांनी वीजबिलासंदर्भातील समस्या मांडली. या परिसरात सुमारे ९०० कुटुंबे असून, स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर वीजबिलामध्ये अनपेक्षित वाढ झाल्याचा रहिवाशांचा दावा आहे. चार हजार रुपयांऐवजी तब्बल ४० हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. स्मार्ट मीटर बसविताना नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक असून, मीटरच्या अचूकतेबाबत कोणतीही शंका राहू नये, यासाठी जुना आणि नवीन मीटर यांची किमान महिनाभर चाचणी करावी. चाचणीत मीटर निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ते कायमस्वरूपी बसविण्यात यावेत, अशी भूमिका केळकर यांनी मांडली.
..................................
बांदल चाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन
रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे बांदल चाळीतील सुमारे ५० कुटुंबे विस्थापित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच घरे हटवावीत, अशी मागणी केळकर यांनी केली. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेशी चर्चा करून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT