खासगी शिकवणी केंद्रांच्या प्रारुपावर ११,४१० हरकती
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम २०२६ चे प्रारूप राज्य शासनाकडून तयार करण्यात आले असून, त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. या प्रारुपाची मराठी व इंग्रजी प्रत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप अधिनियम अंतिम करण्यापूर्वी नागरिकांना आपल्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे तसेच शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयांकडे सूचना व हरकती सादर करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पूर्वी सूचना व हरकती सादर करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत तब्बल ११ हजार ४१० सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शासनाने सूचना व हरकती सादर करण्यासाठीची मुदत वाढविली आहे. आता इच्छुक नागरिकांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपली मते, सूचना व हरकती मांडता येणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व सूचना व हरकतींचा विचार करून महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम २०२६चे प्रारूप अंतिम करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.