मुंबई

कळव्यात "झेप्टो" च्या गोडाऊनवर एफडीआयची धाड!

CD

झेप्टोच्या गोदामावर एफडीएचा छापा
मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळले; तीन तासांच्या चौकशीनंतर गोदाम बंद

कळवा, ता. ७ (बातमीदार) : कळवा येथील झेप्टोच्या गोदामात मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी (ता. ७) छापा टाकला. मुंबई-पुणे रस्त्यावरील दत्तवाडी परिसरातील या गोदामात एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुमारे तीन तास तपासणी केली. या वेळी दही, पनीर यांसह अन्य खाद्यपदार्थांचे मुदतबाह्य साठे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीनंतर गोदाम बंद करण्याचे आदेश कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आले.
कळवा येथील प्रज्वल केणी यांनी रविवारी (ता. ६) आपल्या मुलीसाठी झेप्टोवरून मक्याचे खाद्यपदार्थ मागविले होते. त्यातील चार-पाच तुकडे खाल्ल्यानंतर मुलीला त्रास होऊन पोटदुखी सुरू झाली. डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर केणी यांनी संबंधित उत्पादनाची तपासणी केली असता, त्याची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला.
या तक्रारीची गंभीर दखल घेत एफडीएच्या ठाणे विभाग अधिकाऱ्यांनी सोमवारी गोदामाची तपासणी केली. अधिकारी गोदामात दाखल होताच ठाणे महापालिकेचे गटनेते अभिजित पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि कळवा-खारेगाव परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी कळवा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

‘‘तपासणीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. सध्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून, त्यानंतर कंपनीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.’’
- अरुणा वीरकायदे, एफडीए अधिकारी, ठाणे

‘‘मुदत संपलेले मक्याचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने माझी मुलगी आजारी पडली. यापुढे अशा कंपन्यांकडून खाद्यपदार्थ मागविताना नागरिकांनी काळजी घ्यावी. संबंधित कंपनीवर कारवाई करावी.’’
-प्रज्वल केणी, तक्रारदार, कळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT