मुंबई

शालेय वस्तू पुरवठ्यात दिरंगाई

CD

शालेय वस्तू पुरवठ्यात दिरंगाई
पालिका सभागृहात तीव्र पडसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचा पुरवठा झालेला नाही. या वस्तूंच्या पुरवठ्यात होत असलेल्या दिरंगाईचे तीव्र पडसाद सोमवारी (ता. ७) पालिकेच्या सभागृहात उमटले. विरोधी पक्षाने सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले, तर सत्ताधारी पक्षाने गेल्या १५ ते २० वर्षांतील शालेय वस्तूंच्या पुरवठ्याच्या दिरंगाईचा पाढा वाचला. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन शैक्षणिक साहित्याचे वितरण सुरू असल्याचे तसेच खरेदीत पारदर्शकता असल्याचे स्पष्ट केले.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या पुरवठ्यात दिरंगाईबद्दल पालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवेदन करीत सभागृहाचे लक्ष वेधले. शैक्षणिक साहित्याच्या पुरवठ्यात विलंब आणि जेम पोर्टल खरेदीतील गोंधळावर त्यांनी बोट ठेवले. त्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला. अद्याप हजारो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे हक्काचे शालेय साहित्य पोहोचलेले नाही. नियोजनाच्या अभावामुळे कंत्राटदारांचे भले केल्याचा आरोप त्यानी केला. या दिरंगाईप्रकरणी कंत्राटदाराकडून दंड वसूल करावा, अशी मागणी करीत त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला. दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पेडणेकर यांच्या आरोपाचे खंडन केले. गेल्या १०-१५ वर्षांत शैक्षणिक साहित्याच्या वाटपात कशी दिरंगाई झाली. त्याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला. शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी उत्तर देताना म्हणाल्या की, ‘मुलांच्या आडून आरोप सहन केले जाणार आहेत, २५ वर्षांत तुम्ही काय केले,’ असा सवाल त्यांनी केला. तर कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, मात्र फेक नरेटिव्ह सहन करणार नाही, असा इशारा सभागृहनेते गणेश खणकर यांनी दिला.

वही फेकल्याने गदारोळ
विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या वह्यांमध्ये पाने कमी असल्याचे मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले, मात्र प्रशासनाने वह्यांमध्ये पुरेशी पाने असल्याचा दावा केला, यामुळे संतप्त झालेल्या किल्लेदार यांनी महापौर रितू तावडे यांच्या दिशेने वही फेकली. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT