मुंबई

बांदल चाळीतील १४९ कुटुंबांना पालिकेकडून घरे

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ ः ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नौपाड्यातील बांदल चाळीत ५० वर्षांपासून राहणाऱ्या १४९ कुटुंबांना ठाणे महापालिकेकडून घर मिळणार आहे. या चाळीतील रहिवाशांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे.

नियोजित नवे ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेजवळ रेल्वे मार्गालगत बांदल चाळ वसली आहे. या घरात कुटुंबांच्या चार ते पाच पिढ्या झाल्या. नव्या रेल्वे स्थानकाच्या बांधकामामुळे १४९ घरे तोडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या मालमत्ता विभागाने संबंधित कुटुंबांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले होते. नवीन रेल्वे स्थानक प्रकल्पामध्ये रेल्वेबरोबरच ठाणे महापालिका सहभागी झाली आहे. महापालिकेने नव्या स्थानकासाठी जोड रस्ते व पायाभूत सुविधांची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या कुटुंबांचे महापालिकेने घर देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली होती. त्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांच्यासह संजय वाघुले यांनी नुकतीच आयुक्त राव यांची भेट घेतली होती. त्या वेळी संबंधित कुटुंबांना घर देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बांदल चाळीतील कुटुंबांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली होती. वाघुले यांनी सोमवारी (ता. ७) बांदल चाळीला भेट दिली. या वेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, कनिष्ठ अभियंता अमेय चव्हाण यांचीही उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT