मुंबई

लाटांशी झुंज देत विदीची ऐतिहासिक कामगिरी

CD

लाटांशी झुंज देत विदीची ऐतिहासिक कामगिरी
१३व्या वर्षी ८१ किमीचे अंतर ११ तास ५९ मिनिटांत पूर्ण
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) ः वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी विदी भोर हिने जलतरण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमधील अहिरण घाट ते गोरा बाजार (मुर्शिदाबाद) हा तब्बल ८१ किलोमीटरचा नदी प्रवास ११ तास ५९ मिनिटांत पूर्ण केला. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या संलग्नतेखाली झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात तिने द्वितीय क्रमांक पटकावला असून, हे खडतर अंतर पार करणारी ती सर्वात कमी वयाची जलतरणपटू ठरली आहे.
विदी भोर वाशीतील फादर अँग्नेल हायस्कूल येथे आठवीत शिकत आहे. अहिरण घाट ते गोरा बाजार अंतर म्हणजे केवळ पोहण्याची स्पर्धा नव्हे, तर शरीर आणि मनाच्या क्षमतेची कसोटी. मागील तीन वर्षांत कोणत्याही मुलीला निर्धारित वेळेत हे अंतर पूर्ण करता आले नव्हते, मात्र विदीने आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रत्येक स्ट्रोकसोबत आपली जिद्द कायम ठेवली आणि अखेर ११ तास ५९ मिनिटांत हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला. यापूर्वीही तिने २० किमीचा सोलो स्विम चार तास तीन मिनिटांत आणि ४२ किमीचा सोलो स्विम सात तास ३२ मिनिटांत पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामागे तिच्या कठोर सरावाचा मोठा वाटा आहे. डोंबिवली येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर येथे रूपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी अंतर्गत प्रशिक्षक रूपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. विदीची जिद्द, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास हेच तिच्या यशाचे खरे गमक आहे. कितीही थकवा आला तरी ध्येयापासून ती कधीच दूर झाली नाही. ८१ किमीचे अंतर पूर्ण करणे ही तिच्या कठोर मेहनतीची पावती आहे, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षकांनी व्यक्त केली. विदीचे स्वप्न आता भारताचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याचे असून, भविष्यात इंग्लिश चॅनेल पोहून पार करण्याचे तिचे ध्येय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT