कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : दहा वर्षांनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत सुरू झालेली भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर मनसे, भाजप आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला असून, ही प्रक्रिया तत्काळ स्थगित करून रद्द करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. भरतीसाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती केली असून, या कंत्राटात गैरप्रकार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रशासनाकडे मागविलेली माहिती जवळपास चार महिन्यांपर्यंत देण्यात आली नाही, तर आठ दिवसांत दिलेली माहितीही अपुरी असल्याचा दावा लांडगे यांनी केला. तसेच, भरती प्रक्रियेत स्थानिकांना कोणतीही सुविधा किंवा सवलत दिली नसल्याने मनसेने या प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून, आगामी महासभेतही त्याला विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रियेबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याने पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने चौकशी करण्यासाठी भरतीला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. तसेच भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
यापूर्वी घोटाळ्यांच्या तक्रारी उघड
भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही टीसीएसच्या माध्यमातून होणारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती तत्काळ स्थगित करण्याची मागणी केली. टीसीएसच्या माध्यमातून ज्या-ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात आली, तेथे गैरप्रकार आणि घोटाळ्यांच्या तक्रारी समोर आल्याचा दावा त्यांनी केला. केडीएमसीमध्ये प्रशासकीय राजवट असताना भरतीसंदर्भातील ठराव करण्यात आला; मात्र या प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींना पुरेशी माहिती देण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनीही भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. इतर काही महापालिकांमध्ये टीसीएसच्या माध्यमातून झालेल्या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर त्या प्रक्रिया रद्द केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे केडीएमसीच्या भरती प्रक्रियेतही आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत कुलकर्णी यांनी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.