मुंबई

भिवंडी ग्रामीणमध्ये साथीच्या आजारांचा धोका

CD

वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : सततचा पाऊस, रिमझिम सरी, दमट वातावरण आणि त्यानंतर कोरडे हवामान यामुळे भिवंडी ग्रामीण परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने त्यात शेवाळ आणि घाण जमा झाली आहे. अंबाडी नाका, झिडके, वज्रेश्वरी यांसह विविध भागांत चिखल आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून डास, माशा; तसेच इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.

साचलेल्या पाण्यामुळे डेंगी, मलेरिया, टायफाईड, सर्दी, ताप, खोकला, हिवताप आणि अंगदुखी यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये आणि डासांची पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. डॉक्टरांनी नागरिकांना पाणी उकळून पिणे, ताजे व स्वच्छ अन्न सेवन करणे; तसेच ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी
साथीचे आजार रोखण्यासाठी डास प्रतिबंधक औषध फवारणी, धूर फवारणी आणि स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास आजारांचा वाढता धोका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT