मुंबई

पाणीटंचाईविरोधात नगरसेवक आक्रमक

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : मुंब्रा आणि परिसरात काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमागे कृत्रिम पाणीटंचाई आणि मोठ्या प्रमाणातील पाणीचोरी कारणीभूत असल्याचा दावा नगरसेवक शाकिर शेख, सीमा दाते आणि सामाजिक कार्यकर्ते साकीब दाते यांनी केला आहे. पाणीचोरीला पालिका कर्मचाऱ्यांचे अभय असून येत्या दोन दिवसांत कारवाई करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुंब्र्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी शाकिर शेख यांनी, मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत रेतीबंदर, मुंब्रा आणि कौसा परिसरात अनेक महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. याबाबत आयुक्त आणि नगर अभियंत्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. कल्याण फाटा ते वाय जंक्शन; तसेच मुंब्रा ते शंकर मंदिरदरम्यान एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीवर अनेक ठिकाणी बेकायदा जोडण्या केल्याचा दावा शेख यांनी केला. या जोडण्यांद्वारे व्यावसायिक गाळेधारक आणि हॉटेलचालक पाणीचोरी करत आहेत. प्रभागात केवळ एक तास पाणी सोडले जाते. मग उर्वरित पाणी जाते कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पाणीचोरीत सहभागी असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
साकीब दाते म्हणाले, फेब्रुवारीत आम्ही पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी रमजानच्या काळात पाण्याचे नियोजन केले. मात्र, आता पुन्हा तशीच टंचाई सुरू आहे. पाणी टंचाई वारंवार वाढत आहे. शहराच्या इतर भागांत पाणीपुरवठा नियमित असताना मुंब्र्याशी दुजाभाव का करता? नक्कीच पाणीचोरी हे करतंय कोण? वाॅलमेन पाणीचोरीत आघाडीवर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT