मुंबई

उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषण टाळा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : परंपरा आणि उत्सव जपतानाच त्यांचे स्वरूप समाजातील कोणत्याही घटकाला त्रासदायक ठरणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सण-उत्सव साजरे करताना ध्वनिप्रदूषण आणि अश्लीलतेला थारा देऊ नये, असे आवाहन डॉ. महेश बेडेकर यांनी राज्यातील नागरिकांना खुलेपत्राद्वारे केले आहे.
पुण्यातील विश्वानंद बापट यांनी ध्वनिप्रदूषण आणि सार्वजनिक उत्सवांदरम्यान नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल खुलेपत्रात त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. डॉ. यशवंत ओक, सुमेरा अन्दुतअती, डॉ. कल्याणी मांडके; तसेच उल्हासनगरच्या कै. सरिता खानचंदानी यांच्यासह अनेक नागरिकांनी या विषयावर वेळोवेळी आवाज उठविल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सामाजिक माध्यमांमुळे हा विषय व्यापक चर्चेत आल्याचे पत्रात म्हटले आहे. ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न केवळ एखाद्या विशिष्ट सणापुरता मर्यादित नसून वर्षभर होणाऱ्या सार्वजनिक जयंती, मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य समारंभांशी संबंधित आहे. त्यामुळे उत्सव साजरे करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांसह समाजानेही स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवांचे बदलते स्वरूप आणि वाढता धिंगाणा बहुतांश नागरिकांना मान्य नसतानाही भीती अथवा दडपणामुळे अनेक जण मौन बाळगतात. महाराष्ट्राची शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, आनंद देणारे सण आणि समाजाला एकत्र बांधून ठेवणारे उत्सव सुसंस्कृत, संयमी आणि इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यासाठी सुजाण नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन डॉ. बेडेकर यांनी केले आहे.

आरोग्यावर परिणाम
मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम, कानात सतत आवाज येणे, झोपेचा त्रास, थकवा, एकाग्रता कमी होणे, चिडचिड, तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या उद्‍भवू शकतात. तसेच, रक्तदाब आणि हृदयाच्या गतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला हे ध्वनिप्रदूषणासाठी अधिक संवेदनशील घटक असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT