मुंबई

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांना कायद्याचे बळ

CD

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांना कायद्याचे बळ
स्वतंत्र प्रमाणपत्रासह कर्ज, पीक विमा, अर्थसहाय्य व कृषी सेवांचा लाभ
मुरुड, ता. ८ (बातमीदार) : राज्यातील शेती क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान असूनही त्यांना अधिकृत शेतकरी म्हणून ओळख आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ लागू केला आहे.
या अधिनियमानुसार १८ वर्षे व त्यावरील शेती व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे. स्वतःच्या जमिनीवर शेती करणाऱ्या महिलांसोबतच भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या, भूमिहीन शेतकरी, पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर व पशुचारक महिलांचाही यात समावेश आहे. फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी-वनीकरण, कंपोस्ट निर्मिती आणि गौण वनोत्पादनांशी संबंधित कामांनाही शेतीच्या व्याख्येत स्थान देण्यात आले आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे कृषी अर्थसहाय्य, पतकर्ज, पीक विमा, कृषी विस्तार सेवा, कृषी निविष्ठा आणि बाजारपेठेच्या सुविधांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसभेच्या माध्यमातून प्रमाणपत्राची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, नगर पंचायत क्षेत्रातही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

अर्ज न करताही मिळणार मान्यता
अधिनियमातील महत्त्वाची तरतूद म्हणजे पात्र महिलेने अर्ज केला नसला तरी ग्रामसभेला ती महिला शेतकरी असल्याचे आढळल्यास ठरावाद्वारे स्वाधिकारे मान्यता देता येणार आहे. तसेच महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डेटाबेस आणि महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी परिषद, संनियंत्रण समिती आणि स्वतंत्र कक्षही कार्यरत होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT