मुंबई

अपेक्षित प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

CD

अपेक्षित प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : उच्च शिक्षणासाठी अपेक्षित शैक्षणिक संस्थेत प्रवेश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली परिसरातील हिरानंदानी इस्टेट येथे घडली. अर्णव वझे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

अर्णव कुटुंबीयांसह हिरानंदानी इस्टेट परिसरात राहत होता. यावर्षी त्याने अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रयत्न केले होते; मात्र अपेक्षित प्रवेश न मिळाल्याने तो नैराश्यात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी ७.३०च्या सुमारास बाहेर जात असल्याचे सांगून अर्णव घरातून निघाला. रात्री ८.१५च्या सुमारास त्याने कुटुंबीयांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आत्महत्येबाबत संदेश पाठविला. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधून त्याचा शोध सुरू केला. पोलिस आणि कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता, अर्णव इमारतीखाली गंभीर अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
------
नैराश्यातून टोकाचे पाऊल
शैक्षणिक प्रवेश न मिळाल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नसून, त्यांची तक्रारही नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले. कासारवडवली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT