मुंबई

निर्माल्य-कचरा व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा राबवा

CD

निर्माल्य-कचरा व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा राबवा
कामोठ्यात दिवसातून दोन वेळा कचरा संकलनाची मागणी
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीत निर्माल्य व अतिरिक्त कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. कामोठे प्रभाग क्रमांक ११, १२ व १३ तसेच विविध सोसायट्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्सव काळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचरा वेळेत उचलण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक विकास गरज यांनी सोमवारी (ता. ७) महापौर नितीन पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली .
गणेशोत्सव काळात कचरा वेळेवर न उचलल्यास रस्ते व सोसायटी परिसरात अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास दिवसातून दोन वेळा कचरा संकलन करावे, तसेच अतिरिक्त कचरा गाड्या उपलब्ध करून विशेष संकलन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशमूर्ती विसर्जन व पूजाविधींमुळे वाढणारे निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचीही मागणी करण्यात आली.
गणेशोत्सवात कचरा व निर्माल्य साचू नये, यासाठी महापालिकेने उत्सवापूर्वीच अतिरिक्त मनुष्यबळ, कचरा गाड्या आणि स्वतंत्र निर्माल्य संकलनाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रदीप भगत तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मयूर मोहिते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT