मुंबई

दहीहंडी दुर्घटनेतील जखमींना महापौर सहायता निधीतून मदत द्या

CD

दहीहंडी दुर्घटनेतील जखमींना महापौर साहाय्यता निधीतून मदत द्या!
नगरसेवक सुमीत झुंझारराव यांचे महापौर नितीन पाटील यांना पत्र

पनवेल, ता. ८ (बातमीदार) : लाइनआळी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘महापौर साहाय्यता निधी’तून मदत करण्याची मागणी नगरसेवक सुमीत झुंझारराव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर नितीन पाटील यांची भेट घेऊन पत्राद्वारे ही मागणी लावून धरली.
पनवेलमधील लाइनआळी परिसरात दहीहंडीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत काही नागरिक जखमी झाले. महापौर साहाय्यता निधीतून मदत मिळाल्यास जखमी नागरिकांना उपचारासाठी मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे संबंधित प्रकरणाचा तातडीने आढावा घेऊन पात्र जखमी नागरिकांना आवश्यक ती आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, भविष्यात दहीहंडी तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे योग्य नियोजन, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, पोलिस व प्रशासनाशी समन्वय तसेच आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन याबाबत आयोजकांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, असेही झुंझारराव यांनी नमूद केले. या वेळी नगरसेविका रुचिता लोंढे उपस्थित होत्या. जखमी नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT