ठाणे, ता. ८ (बातमीदार) : ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चार प्रवाशांच्या खिशातून पाच भ्रमणध्वनी लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये ७० हजार रुपये किमतीचे भ्रमणध्वनी चोरीला गेले असून, त्यापैकी एका घटनेत मुंब्रा येथील क्रिकेटपटूचा महागडा भ्रमणध्वनी चोरीला गेला आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोपरखैरणे येथील गणेश अधिकारी हे ७ सप्टेंबरला मित्राला भेटण्यासाठी कांदिवलीला जाण्यासाठी ठाणे स्थानकात आले होते. फलाट क्रमांक १० वर उतरून पुलाखालील कट्ट्यावर बसले असताना त्यांना डुलकी लागली. त्याच वेळेस त्यांच्या खिशातील मोबाईल गायब झाला. दुसऱ्या घटनेत बिहारहून ठाण्यात आलेल्या रामनाथ राम यांना फलाट क्रमांक एकवरील आरक्षण कक्षात झोप लागली. याचा फायदा घेत चोरट्याने १० हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी चोरला. ही घटना ८ सप्टेंबरच्या पहाटे घडली.
मुंब्रा येथील क्रिकेटपटू तेजवीर सिंग (२४) हे कुर्ला येथे जाण्यासाठी फलाट क्रमांक दोनवर आले होते. सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये गर्दीतून चढताना त्यांच्या खिशातील ४० हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी चोरट्याने लंपास केला. तर मुरबाड येथील सागर पाटील हे पत्नीसह ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढताना त्यांच्या खिशातील प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन भ्रमणध्वनी चोरीला गेले. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.