मुंबई

स्पॉट राऊंडमधील विद्याथी शिष्यवृत्ती आणि शुल्क सवलतीपासून दूर

CD

संस्थात्मक प्रवेशातील विद्यार्थी
शिष्यवृत्ती, सवलतींपासून वंचित
मुलींच्या मोफत शिक्षणालाही खिळ
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, एमबीए, बीएमएस आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत संस्था स्तरावर (इन्स्टिट्यूट लेव्हल) प्रवेश मिळवणाऱ्या राज्यातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसोबत शैक्षणिक शुल्क सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. तंत्रशिक्षणच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १४ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यातच राज्यात मुलींना मोफत शिक्षणाची सवलत असतानाही त्या सवलतीलाही खीळ बसली जात असून, यातून असंख्य मुली व्यावसायिक शिक्षणापासून दूर फेकल्या जात असल्याचे चित्र राज्यभरात आहे.
राज्य सीईटी सेलकडून तंत्रशिक्षण अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, एमबीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या. यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात बहुतांश विद्यार्थी सीईटीच्या विविध फेऱ्यांमध्ये सहभागी झाले होते, परंतु काही कारणांमुळे त्यांचे प्रवेश झालेले नाहीत; मात्र आता अखेरचा पर्याय म्हणून संस्था स्तरावर प्रवेश घेत आहेत. यात संस्था विद्यार्थ्यांकडून शुल्क नियामक प्राधिकरणने ठरवून दिलेले शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क अनेक ठिकाणी लाखो रुपयांचे असून, अनेक मुलींना ते भरणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने मुलींच्या मोफत शिक्षणाचे धोरण या संस्था स्तरावरील फेरीसाठी लावावे आणि सामाजिक न्याय विभागासोबत इतर मागास विभागाने आपल्या घटकातील मुलांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्कांची सवलत द्यावी, अशी मागणी पालक संघटनेच्या दीपाली सरदेशमुख यांनी केली आहे.
–---
मागास घटकातील विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेरीतून प्रवेश मिळाल्यास त्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सवलती दिल्या जातात; मात्र संस्था स्तरावरील अडचणी काय आहेत, याबाबत माहिती घेतली जाईल.
- दीपा मुधोळ-मुंढे, आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
-
संस्था स्तरावर प्रवेश घेणारे विद्यार्थी हे कॅप फेऱ्यांमध्ये होते, मात्र त्यांना प्रवेश मिळालेले नसल्याने त्यांना हा पर्याय घ्यावा लागत असेल, तर त्यांना शिष्यवृत्ती, सवलती देण्याची जबाबदारी सरकारी आहे.
- ई. झेड. खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT