मुंबई

''विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्या''ला आव्हान

CD

‘विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्या’ला आव्हान 
याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा, २०२५’च्या घटनात्मक वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ८) राज्य सरकारला दिले. या कायद्यान्वये राज्य सरकारला विविध संघटनांना ‘बेकायदा’ घोषित करण्याचे आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे व्यापक अधिकार प्राप्त झाल्याचा दावा याचिकेत केला आहे. 

काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) आणि पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (पीयुसीएल) यांनी या काद्याच्या वैधतेला आव्हान दिले आहे. न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, या कायद्यातील अनेक तरतुदी अत्यंत आक्षेपार्ह आहेत. या तरतुदींमुळे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय घरे जप्त करून घरातील सामान हटवण्याचे अधिकार प्रशासनाला मिळणार असल्याचे, याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना वरिष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला सांगितले. यातील काही तरतुदी १९५२ मध्येच न्यायालयांनी रद्द केलेल्या तरतुदींशी मिळत्याजुळत्या आहेत. काही तरतुदींमध्ये संदिग्धता असल्याचे सांगून सिरवई यांनी ‘श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला. या निकालात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील संदिग्ध निर्बंधांबाबतच्या घटनात्मक मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या होत्या. 
न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा थोडक्यात युक्तिवाद ऐकल्यानंतर, राज्य सरकारला अद्याप औपचारिक नोटीस बजावली नसल्याचे निदर्शनास आले त्याची दखल घेऊन न्यायालयाने नोटीस बजावून सरकारला त्यांचे उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले व प्रकरणाची सुनावणी ६ ऑक्टोबरला ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवामानाचा अंदाज अन् पायलटनं फिरवला निर्णय; राहुल गांधींच्या विमानाला का करावं लागलं 'गो-अराउंड'? लँडिंगच्या १० मिनिटांपूर्वी काय घडलं?

Thalapathy Vijay Assembly Row : हनुवटीवर हात अन् MISA कायद्याचा संदर्भ; स्टॅलिन यांच्यावरील 'त्या' कृतीवर विधानसभेत गदारोळ का झाला? थलपथी विजय यांचं स्पष्टीकरण

२ वर्षाची झाली दुआ पादुकोण सिंह! रणवीर- दीपिकाने शेअर केले खास फोटो; अभिनेत्रीच्या बेबी बम्पने वेधलं लक्ष

Education Awards: डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीमच्या दोन प्राध्यापकांचा गौरव

युद्धाचा भडका आणि जागतिक संकट, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित कशी? PM मोदींनी स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT