मुंबई

भिवंडीत घरफोडीत २३ तोळे सोन्याची चोरी

CD

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : शहरातील काप आळी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २३.५ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी आणि एक लाख २० हजार रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. शनिवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्ह्यात केवळ दहा तोळे सोन्याची चोरी नोंदविल्याचा आरोप केसरवाणी कुटुंबीयांनी केला आहे.
धर्मेंद्र लालचंद केसरवाणी हे पत्नी व मुलांसह घराला कुलूप लावून घुंगटनगर येथे गेले होते. मध्यरात्री एक वाजता घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यातील मंगळसूत्र, अंगठ्या, हार, बांगड्या, झुमके तसेच चांदीच्या पैंजण आणि रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीनंतर दागिन्यांची बॅग खांद्यावर घेऊन जाणारा चोरटा रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर चोरीचा मुद्देमाल नेण्यासाठी वापरलेली बॅगही पोलिसांना सापडली. मात्र, चोरटा अद्याप फरार आहे.
दरम्यान, घरातून २३.५ तोळे सोने चोरीला गेले असून त्याची अधिकृत बिले आपल्याकडे असल्याचे केसरवाणी कुटुंबीयांनी सांगितले. पोलिसांनी चोरीच्या सोन्याची पूर्ण नोंद करावी आणि चोरट्याला तातडीने अटक करून मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT