मुंबई

श्रीवर्धनमध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी

CD

श्रीवर्धनमध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी
बायपासचा प्रस्ताव कागदावरच; जेट्टीच्या विकासकामांना वेग, वाहतूक व्यवस्थेकडे मात्र दुर्लक्ष
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) : श्रीवर्धन शहरात विविध विकासकामांना वेग आला असला, तरी अरुंद रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. जीवना बंदर येथील मत्स्य बंदराचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून, मुळगाव कोळीवाडा येथे बंधारा आणि जेटीचे कामही प्रगतिपथावर आहे. या विकासकामांमुळे भविष्यात पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता असताना शहरातील अपुरी रस्ते व्यवस्था मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
शहरातील तसेच बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते अवघे १० ते १२ फूट रुंदीचे आहेत. याच रस्त्यांवर पर्यटकांची वाहने, स्थानिक वाहने, मालवाहतूक करणारी वाहने आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वारंवार वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला होता, मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर घरे बाधित होणार असल्याने स्थानिकांनी विरोध केला. परिणामी हा प्रस्ताव रखडला असून पर्यायी बायपास रस्त्याचा प्रस्तावही अद्याप कागदावरच आहे. दरम्यान, बाजारपेठेतील कोंडी कमी करण्यासाठी अनधिकृत फेरीवाले आणि टपरीधारकांवर कारवाई केली जात असली, तरी कायमस्वरूपी वाहतूक नियोजनाची गरज आहे.

वाहतुकीचे नियोजनाची गरज
श्रीवर्धनमध्ये जेट्टी, बंधारा आणि मत्स्य बंदरासारखी महत्त्वाची कामे सुरू असल्याने भविष्यात पर्यटक आणि वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, मात्र त्याच तुलनेत शहरातील रस्त्यांची क्षमता वाढलेली नाही. त्यामुळे सध्याची वाहतूक कोंडी भविष्यात आणखी तीव्र होऊ शकते. बायपास किंवा पर्यायी मार्गाची आखणी वेळेत झाली नाही, तर कोट्यवधींच्या विकासकामांनंतरही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.


कोट :
येत्या काळात श्रीवर्धन शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात येणार असून, वाहतुकीची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. भविष्यात रस्ता रुंदीकरणाची गरज भासल्यास स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय न करता वाहतूक समस्येचे निराकरण करण्यात येईल.
- ॲड. अतुल चौगुले, नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT