मुंबई

१०० वर्षांच्या पिंपळावर साकरणार शंकर-गणरायाची भव्य प्रतिमा

CD

उल्हासनगर, ता. ९ (बातमीदार) : उल्हासनगर रेल्वे स्थानकासमोरील सिंधी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हरचुराम मंदिरासमोरील १०० वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडावर भगवान शंकर आणि गणरायाची भव्य प्रतिमा साकारण्यात येणार आहे. मंदिराचे विश्वस्त शंकर आहूजा आणि त्यांचे पुत्र अमित आहूजा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील चित्रकार ही प्रतिमा साकारणार आहे. पुढील आठवड्यात ही भव्य प्रतिमा भाविकांच्या दर्शनासाठी तयार होणार आहे.
हरचुराम मंदिरात ७० वर्षांपासून अखंड पवित्र ज्योत प्रज्वलित आहे. सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांना समर्पित असलेल्या या मंदिरात भगवान शिव, शनिदेव आणि हनुमान यांच्या आकर्षक मूर्तीही आहेत. मंदिरातील अखंड ज्योत ही भाविकांसाठी विशेष श्रद्धेचा विषय असून, तिची दर २४ तासांनी अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते. मंदिरासमोरील शंभर वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. याच झाडावर १८ बाय ५० फूट आकाराची भगवान शंकर आणि गणरायाची भव्य प्रतिमा साकारली जाणार असल्याची माहिती आहूजा यांनी दिली. या प्रतिमेमुळे मंदिर परिसराच्या धार्मिक सौंदर्यात भर पडणार असून, भाविकांसाठी हे नवे आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT