मुंबई

वाजे फायरिंग रेंजच्या वळणावर चोरट्यांचा धुमाकूळ?

CD

वाजे फायरिंग रेंजच्या वळणावर चोरट्यांचा धुमाकूळ?
दुचाकीस्वार आदिवासी दाम्पत्याला अडवले; शिवसेनेकडून पोलिसांकडे नियमित पेट्रोलिंगची मागणी
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : पनवेल-माथेरान मार्गावरील वाजे येथील पोलिस फायरिंग रेंजच्या वळणावर रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसणाऱ्या संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या वतीने पनवेल तालुका पोलिसांकडे करण्यात आली आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी नियमित पोलिस गस्त (पेट्रोलिंग) वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रविवारी (ता. ६) रात्री वाजे येथील फायरिंग रेंजच्या वळणावर काही अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या दबा धरून बसले होते. याच मार्गावरून एक आदिवासी महिला व पुरुष दुचाकीवरून जात असताना या व्यक्तींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. त्याच वेळी मागून काही आदिवासी बांधव येत असल्याने त्यांनी तातडीने आपली वाहने थांबवली. यानंतर दबा धरून बसलेले व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे वाजे परिसरासह आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असून, खरेदी तसेच कामानिमित्त नागरिक, आदिवासी महिला-पुरुष आणि नोकरदार वर्ग रात्री उशिरापर्यंत या मार्गावरून पनवेलकडे ये-जा करतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू करून संशयितांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका उपप्रमुख विश्वास पाटील, तालुका संघटक दिनेश मांडवकर आणि नेरे विभागप्रमुख विद्याधर चोरघे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT