मुंबई

जुलै २०२५ मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा

CD

पालिका पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग एका वर्षानंतर मोकळा
११ सप्टेंबरला संकेतस्थळावर होणार जाहीर; करार कर्मचाऱ्यांची पदे वगळून उर्वरित पदांवरच नियुक्त्या
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिकेच्या गट क आणि गट ‘ड’मधील ६६८ पदांसाठी जुलै २०२५ मध्ये घेतलेल्या सरळसेवा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेला पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी मिळाली असून, निकाल ११ सप्टेंबरला अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
महापालिकेच्या ६६८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. टीसीएस आयओएनमार्फत १६ ते १९ जुलै २०२५ दरम्यान झालेल्या ऑनलाइन परीक्षेला ६८ हजार १४९ उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली होती. परंतु, करार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट २०२५ला निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर १९ ऑगस्टला न्यायालयाने अंतरिम अर्ज निकाली काढत भरती प्रक्रिया पुढे नेण्यास महापालिकेला परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या कार्यरत असलेल्या ४७७ करार कर्मचाऱ्यांच्या पदांना बाधा न पोहोचवता उर्वरित उपलब्ध पदांवरच नवीन नियुक्त्या केल्या जातील. त्यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध पदांची संख्या ६६८ पेक्षा कमी होणार आहे. करार कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर उर्वरित पदांवरील नियुक्तीबाबत महापालिका पुढील निर्णय घेणार आहे. निकाल प्रसिद्ध होत असल्याने हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष नियुक्त्या केवळ उपलब्ध पदांच्या मर्यादेतच केल्या जातील, असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT