मुंबई

धान्य बाजारातील गटारांची दुरवस्था

CD

धान्य बाजारातील गटारांची दुरवस्था
तुटलेल्या झाकणांमुळे अपघाताचा धोका; वाहनचालकांची कसरत

जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) धान्य बाजारातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. प्रवेशद्वारांवरील खड्डे बुजविण्यात आल्याने बाजार घटकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी अंतर्गत रस्त्यांलगतच्या गटारांवरील झाकणे तुटल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी, वाहतूकदार आणि ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धान्य बाजारातील ‘ए’ पाकळीच्या शेजारील गटारावरील झाकणे तुटल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठा खड्डा पडल्याने हा परिसर वाहनचालकांसाठी अपघाताचा सापळा ठरत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड मालवाहू वाहनांची ये-जा सुरू असते. खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, काही ठिकाणी वाहतूक कोंडीही होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटणे, सस्पेन्शनसह अन्य यांत्रिक भागांचे नुकसान होण्याच्या घटनाही घडत असल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे.
राष्ट्रीय बाजाराचा दर्जा असलेल्या एपीएमसीच्या धान्य बाजारातील पायाभूत सुविधा सक्षम असणे अपेक्षित आहे; मात्र अंतर्गत रस्त्यांची अवस्था पाहता ‘राष्ट्रीय बाजाराचा दर्जा; मात्र मूलभूत सुविधांची वानवा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. अपघात टाळण्यासाठी तात्पुरते दगड ठेवण्याऐवजी तुटलेली गटारांची झाकणे तातडीने बदलण्यात यावीत. एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी बाजार घटकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT