नवी मुंबईत मांजर निर्बीजीकरण
मुंबईतील धर्तीवर उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : मुंबई पालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई पालिकाही शहरातील भटक्या मांजरांचे निर्बीजीकरण करणार आहे. श्वानांच्या तुलनेत मांजरांना पकडणे अधिक आव्हानात्मक असले तरी सुरुवातीला ३०० मांजरांचे निर्बीजीकरण करण्याचे निश्चित केले आहे. यासोबतच भटका प्राणी चावल्यास नागरिकांना मोफत उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचे नियंत्रण आणि मांजरांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम अधिक गतीने राबवण्यासाठी ईन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स इंडिया या संस्थेला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. यासाठी एक कोटी २८ लाख १८ हजार २९० इतक्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये ३०० भटक्या मांजरांचे निर्बीजीकरण, एक हजार श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण, चार हजार श्वान पकडणे आणि तीन हजार आजारी/अपघातातील प्राण्यांवर उपचार व देखभाल केली जाणार आहे. शहरातील नागरिकांना कुत्रा अथवा भटका प्राणी चावल्यास रुग्णालयातील उपचार, औषधे आणि रेबीज लस पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे.
मांजरींना पकडण्यातील प्रमुख आव्हाने
मुंबई पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अनुभवानुसार, श्वानांच्या तुलनेत मांजरींना पकडणे अधिक कठीण असते. मांजरी उंच ठिकाणी, इमारतींच्या सांध्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये सहज लपून बसतात. त्यामुळे मुंबईत सहा वर्षांत १.१८ लाखांपेक्षा जास्त श्वानांचे निर्बीजीकरण झाले असताना मांजरांचा आकडा २४ हजार ५०० वर राहिला. नवी मुंबई महापालिकेने मुंबईच्या या अनुभवातून धडा घेत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.