मुंबई

थारचा वेग पोलिसांपुढे फिका!

CD

थारचा वेग पोलिसांपुढे फिका!
बदलापूरजवळ जंगलात पाठलाग; दोन कट्टे, सात काडतुसे जप्त
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : फरारी आरोपीच्या शोधासाठी राबविलेल्या मोहिमेत कुळगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे आणि काळ्या रंगाची थार गाडी जप्त केली. या कारवाईत साहिल दत्ता जाधव (वय १९, रा. बदलापूर) याला अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

दिग्विजय ऊर्फ डिग्या पिसाळ हा ‘पाहिजे’ आरोपी साई-वालिवली परिसरात असल्याची माहिती कुळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असता पिसाळ काळ्या रंगाच्या थारमधून जाताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने थार जांभूळ गावाच्या दिशेने वेगाने पळवली. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. जांभूळ गावाबाहेरील जंगल परिसरात पिसाळने गाडी सोडून अन्य तिघांसह पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर थारची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन लोखंडी गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी कुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमातील कलम ३ व २५ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पिसाळ याच्यासह साहिल दत्ता जाधव आणि रुतुराज संतोष राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. ‘पाहिजे’ आरोपी दिग्विजय ऊर्फ डिग्या पिसाळ याचा शोध सुरू आहे.

पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल आणि मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, प्रदीप बोदडे तसेच सोमनाथ मोरे, सोमनाथ घरटे, नरेंद्र कोळी, सचिन जाधव, अविनाश वाकचौरे आणि भूषण राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोदडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT