‘एमएमआरडीए’च्या पुनर्वसन विभागाची उचलबांगडी
उपजिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंतच्या तडकाफडकी बदल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईसह परिसरात एमएमआरडीएकडून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना घरे देण्यासाठी एमएमआरडीएमध्ये सामाजिक विकास शाखा कार्यरत आहेत. त्यांच्या कामात अनियमितता आढळून आल्याने आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी सामाजिक विकास विभागाची अख्खी टीमच बदलली आहे. त्यानुसार या शाखेतील उपजिल्हाधिकारी ते शिपाई अशा एकूण १६ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करत त्यांच्या जागी नवीन पथक नियुक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
‘एमएमआरडीए’च्या सामाजिक विकास विभागाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी नुकतीच सामाजिक विकास शाखेची अचानक पाहणी केली. त्यामध्ये शाखेच्या परिसरात काही अनधिकृत व्यक्तींचा वावर, कामकाजातील प्रक्रियात्मक त्रुटी आणि काटेकोर प्रशासकीय नियंत्रणाची गरज असल्याचे निदर्शनास आले. या बाबींची गंभीर दखल घेत त्यांनी संपूर्ण कार्यपद्धतीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आलेल्या तथ्यांच्या आधारे केवळ काही जणांच्या बदल्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण विभागाचीच फेररचना करण्यात आली. प्रकल्पबाधितांशी संबंधित प्रकरणे, नोंदी, अर्जांची छाननी आणि पुढील कार्यवाहीसाठी नव्याने जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एमएमआरडीएमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, एमएमआरडीएकडे विविध मेट्रो आणि पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी असते. त्यामुळे या शाखेचे कामकाज पूर्णपणे पारदर्शक, नोंदणीय आणि मध्यस्थमुक्त राहणे आवश्यक आहे, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.