मुंबई

बेगम परवीन सुलताना यांची शुक्रवारी मैफल

CD

बेगम परवीन सुलताना यांची उद्या मैफल

‘मीटिंग ऑफ माइंड्स’चे लोकभवन येथे आयोजन

मुंबई, ता. ९ : भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा युवा पिढीमध्ये प्रसार करण्यासाठी काम करणाऱ्या सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चरल अमंग्स्ट युथ अर्थात ‘स्पाइक मॅके’च्या मुंबई चॅप्टरतर्फे शुक्रवारी (ता. ११) ‘मीटिंग ऑफ माइंड्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पद्मभूषण पुरस्कारविजेत्या विदुषी बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगणार आहे. या वेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
१९७७ मध्ये स्थापना झालेल्या ‘स्पाइक मॅके’ संस्थेला पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ‘ॲन इव्हनिंग ऑफ आयडियाज, इन्स्पिरेशन अँड कल्चरल रेझोनन्स’ या उपक्रमातून सांस्कृतिक संवाद, सहकार्य आणि भारतीय वारशाची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी शुक्रवारी ‘मीटिंग ऑफ माइंड्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दुपारी ३ ते ५ या वेळेत सल्लागार मंडळाची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत पद्मभूषण पुरस्कारविजेत्या विदुषी बेगम परवीन सुलताना यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगणार आहे. लोकभवन येथील मुख्य सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी ८१०८०९८२४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----
पुढील वर्षी सुवर्ण महोत्सव
संस्थेची वाटचाल, सांस्कृतिक उपक्रम आणि २०२७ मध्ये होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या तयारीविषयी ‘स्पाइक मॅके’चे संस्थापक डॉ. किरण सेठ आपले विचार मांडणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या संस्थेच्या कार्याला या कार्यक्रमातून अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास यानिमित्त व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT