मुंबई

सॅटेलाईटद्वारे मुंबईतील पाणीसाठ्यांचा शोध घ्या!

CD

सॅटेलाईटद्वारे मुंबईतील पाणीसाठ्यांचा शोध घ्या!
मुंबई, ता. ९ : ‘मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा, पावसाची अनियमितता पाहता यामुळे पाणीप्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने सॅटेलाईटद्वारे मुंबईतील पाणीसाठ्यांचा शोध घ्यावा, पाण्याची विक्री करणाऱ्या टँकर लॉबीवर कारवाई करावी तसेच मुंबईतील नैसर्गिक तलाव, विहिरी आणि झरे यांचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध करावे,’ असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने घसरल्यानंतर पालिकेने मुंबईत मे महिन्यामध्ये निवासी क्षेत्रात १० टक्के तर व्यावसायिक क्षेत्रात २० टक्के पाणीकपात लागू केली होती. सध्या सात तलावांत मिळून ९५ टक्के इतका पाणीसाठा आहे. मात्र पावसाची अनियमितता, शासन आदेशानुसार पुढील ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पाणी नियोजन पाहता पालिकेने अद्यापही मुंबईतील १० टक्के ते २० टक्के पाणीकपात सुरूच ठेवली आहे. दुसरीकडे सभागृहनेते गणेश खणकर यांनी त्यांच्या विभागातील नागरिकांकडून पाण्याची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत जुलै महिन्यानंतर अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जरी तलावांत ९५ टक्के पाणीसाठा असला तरी पाण्याचा जपून वापर करावा लागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT