मुंबई

पनवेलमधील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी बाळाराम पाटील यांचा पुढाकार

CD

पनवेलमधील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी बाळाराम पाटील यांचा पुढाकार
आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत बैठक; रस्ते, गटारे, रिंग रोड, झोपडपट्टी पुनर्वसनासह मूलभूत सुविधांवर चर्चा
पनवेल, ता. १० (बातमीदार) ः पालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पनवेल पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत बाळाराम पाटील, माजी नगरसेवक व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान पडघे, रोहिजण, धरणा कॅम्प आणि नावडे परिसरातील अंतर्गत रस्ते व गटारांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच, वळवली आणि टेंभोडे रिंग रोड तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नावडे झोपडपट्टी परिसरातील ब्रिजजवळ काँक्रीटीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या पाणी, रस्ते, गटारे आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही प्रशासनाने गती द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी, नगरसेवक राम पाटील, लतीफ शेख, नगरसेविका योगिता समीर फडके, मनीषा आनंद म्हात्रे, नगरसेवक आर्या प्रवीण जाधव, नगरसेविका अर्चना योगेश भोईर, दिलीप कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT