म्हस्के, शिंदे यांना सलग
दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाण्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दिल्लीच्या संसदेत ठाण्याचा झेंडा पुन्हा उंचावला आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संसदीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. एकाच परिसरातील दोन खासदारांना सलग दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाल्याने ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील भीम हॉलमध्ये बुधवारी झालेल्या सोहळ्यात केंद्रीय कोळसा व खाणमंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत दोन्ही खासदारांचा गौरव करण्यात आला. खासदार म्हस्के यांनी संसदेत मतदारसंघातील प्रश्नांसह रेल्वे, पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, नगरविकास आणि गृहनिर्माणाशी संबंधित मुद्दे सातत्याने उपस्थित केले. विविध कायदे, सरकारी धोरणे आणि लोकहिताच्या विषयांवर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. संसदीय समित्यांतही सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी ठाण्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा केला.
माझ्या एकट्याचा हा पुरस्कार नसून, जनतेचा आणि माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया म्हस्के यांनी व्यक्त केली. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या सन्मानामुळे दोन्ही खासदारांच्या संसदीय कामगिरीवर पुन्हा राष्ट्रीय पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.