मुंबई

विक्रमगड तालुक्यात लाेकअदालतीचे आयाेजन

CD

विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात महात्मा जोतिबा फुले महसूल लोकअदालत अभियान १ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जमिनीचे वाद, हक्कसंबंधित दावे, फेरफार नोंदी तसेच अन्य महसुली प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घ काळ प्रलंबित राहिल्याने नागरिक व शेतकऱ्यांच्या वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान आयोजित केले आहे.

विक्रमगड तहसील कार्यालय तसेच संबंधित महसूल न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या महसुली दावे व अपील प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांची परस्पर संमती असल्यास तडजोड घडवून आणून प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार तडजोडीच तयार आहेत. त्यांनी संबंधित प्रकरणातील प्रपत्र-‘अ’मधील नमुन्यानुसार तडजोडीसाठी अर्ज सादर करावा.

विक्रमगड तहसील कार्यालयात ३० सप्टेंबर, १६ डिसेंबर, १७ मार्च २०२७ मध्ये महात्मा फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून, प्राप्त झालेल्या अर्जांचे छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षकारांची तडजोडी बाबतची संमती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार तडजोड नामा तयार करून महसूल न्यायालयाच्या दिवशी दोन्ही पक्षाच्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहे.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT